रत्नागिरी : ज‍िल्‍हा बँकर्स आणि नगर राजभाषा कार्यान्‍वयन समि‍तीतर्फे भाट्ये किनारी स्‍वच्‍छता

Sep 21, 2024 - 11:04
 0
रत्नागिरी : ज‍िल्‍हा बँकर्स आणि नगर राजभाषा कार्यान्‍वयन समि‍तीतर्फे भाट्ये किनारी स्‍वच्‍छता

रत्नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍हा बँकर्स तथा नगर राजभाषा कार्यान्‍वयन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने झरी विनायक मंदिर, भाट्ये बीच परिसरात स्‍वच्‍छता अभियान राबविण्यात आले.

यामध्‍ये ७० पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला. त्‍याचवेळी स्‍वच्‍छता प्रार्थनाही घेण्‍यात आली.

अनंत चतुर्दशीदिवशी दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन केले जाते. त्‍यावेळी समुद्र किनारी साठलेला कचरा गोळा करण्‍यासाठी स्‍वच्‍छता मोहीम हाती घेतली होती. ही मोहिम संयुक्‍तपणे आयोजित केली गेली होती. स्‍वच्‍छता मोहिमेत बँक ऑफ इंडिया आंचलिक कार्यालय, सर्व बँकर्स, भारतीय तटरक्षक कार्यालय, आकाशवाणी, जीएसटी, आयकर, न्‍यू इंडिया अॅश्‍यूरन्स कं., दीपस्तंभ डीजीपीएस कार्यालय या संस्‍थांमधील स्टाफ सदस्‍यांनी उत्‍साहपूर्ण सहभाग घेतला.

स्‍वच्‍छता मोहिमेत बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख नरेंद्र रघुनाथ देवरे उपस्थित होते. अग्रणी जिल्‍हा कार्यालयाचे व्‍यवस्‍थापक मुकुंद खांडेकर, नगर राजभाषा कार्यान्‍वयन समितीचे सदस्‍य सचिव रमेश गायकवाड व बँक ऑफ इंडियाच्‍या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow