पवार साहेबांनाही वाटत होतं त्यांचे 4 पेक्षा जास्त खासदार येणार नाहीत, त्यामुळेच हा निकाल आपल्यासाठी सुखावह नाही : आशिष शेलार

Jun 8, 2024 - 15:31
 0
पवार साहेबांनाही वाटत होतं त्यांचे 4 पेक्षा जास्त खासदार येणार नाहीत, त्यामुळेच हा निकाल आपल्यासाठी सुखावह नाही : आशिष शेलार

मुंबई : पवार साहेबांनाही (Sharad Pawar) वाटत होते की त्यांच्या पक्षाचे चार पेक्षा जास्त खासदार येणार नाहीत, पण अनपेक्षितपणे त्यांचे खासदार निवडून आले, त्यामुळे लोकसभेचा हा निकाल आपल्यासाठी नक्कीच सुखावह नाही, असं वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलं.

राज्यातील निवडणुकीत अनेक वाईट गोष्टींचा अपप्रचार करण्यात आला, त्याचा फटका भाजपला बसल्याचंही ते म्हणाले.

लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक भाजपच्या दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालयात दुपारी एक वाजता सुरू झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यात राज्यातील विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा यावेळी घेतला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आला.

हा निकाल भाजपसाठी अनपेक्षित

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, राज्यातला निकाल हा अनपेक्षित आहे. शरद पवारांनाही त्यांचे चारपेक्षा जास्त खासदार निवडून येतील असं वाटत नव्हतं. राज्यात चुकीचा प्रचार करण्यात आला आणि त्यामुळे भाजपच्या जागा कमी आल्या. त्यामुळे राज्यातील लोकसभेचा निकाल आपल्यासाठी आनंद देणारा नाही.

भाजपच्या सर्व विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना मार्गदर्शन केलं तसेच विधानसभेच्या अनुषंगाने आमदारांना कानमंत्र दिला. पक्षांतर्गत अस्वस्थता, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील राजकीय स्थितीवर या बैठकीत चर्चा झाली.

देवेंद्र फडणवीस हा लढणारा माणूस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत चांगलं काम केलं. पण राजकीय गणितात आपण कुठेतरी कमी पडलो. अपयशाची कारणं शोधून ती दूर केली जातील. आपला लढा हा समोरच्या तीन पक्षांविरोधात नव्हता, तर आपल्याविरोधात नॅरेटिव्ह तयार केला गेला, त्याविरोधात आपण लढताना कमी पडलो. गेल्या दोन निवडणुकीत महाराष्ट्राने मोदींच्या विजयात जो वाटा उचलला होता, यंदा तो आपण देऊ शकलो नाही. पण देवेंद्र फडणवीस हा पळणारा माणूस नाही, लढणारा माणूस आहे.

भाजपच्या बैठकीला कोण कोण उपस्थित?

चंद्रशेखर बावनकुळे
प्रवीण दरेकर
श्रीकांत भारतीय
सुधीर मुनगंटीवार
विद्या ठाकूर
रणधीर सावरकर
अतुल सावे
आशीष शेलार
गोपीचंद पडळकर
श्रीकांत भारतीय
नितेश राणे
गिरीश महाजन
मिहीर कोटेचा
रविंद्र चव्हाण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 08-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow