IND vs PAK: टीम इंडियाचा पाकिस्तानवर 6 धावांनी थरारक विजय

Jun 10, 2024 - 10:04
 0
IND vs PAK: टीम इंडियाचा पाकिस्तानवर 6 धावांनी थरारक विजय

टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार बॉलिंग करत पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 113 धावांवर रोखलं.

टीम इंडियाचा हा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा सातवा विजय ठरला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार पद्धतीने 119 धावांचा बचाव केला. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा खऱ्या अर्थाने टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बुमराहने 19 व्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा 1 विकेट घेतली. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांचं आव्हान राहिलं. अर्शदीपने या 18 धावांचा बचाव करत फक्त 12 धावा दिल्या आणि टीम इंडियाने हा सामना 6 धावांनी जिंकला.

पाकिस्तानची 120 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. पाकिस्तान ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्यानुसार तेच जिंकणार, असं चित्र होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत पाकिस्तानचा पराभूत केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान याने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर बाबर आझम, उस्मा खान आणि फखर झमान या तिघांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. तर इमाद वसीमने 15 धावांचं योगदान दिलं. शादाब खान 4 आणि इफ्तिखार अहमदने 5 धावा केल्या. नसीम शाह याने नाबाद 10 धावा केल्या. तर शाहिन अफ्रिदी 0 वर नाबाद परतला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने 4 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाचा 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. दोघे भोपळा फोडण्यात अपयशी ठरले. चौघांना जास्तीत जास्त 9 धावांपर्यंतच मजल मारता आली. तर एकटा नेहमीप्रमाणे नाबाद परतला.

ऋषभ पंतने टीम इंडियासाठी सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. अक्षर पटेल याने 20 आणि कॅप्टन रोहित शर्मा याने 13 धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा दोघांना खातंही उघडता आलं नाही. तर विराट कोहली 4, सूर्यकुमार यादव 7, शिवम दुबे 3 आणि अर्शदीप सिंहने 9 धावा केल्या. तर मोहम्मद सिराजने नाबाद 7 धावा केल्या. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरीस रौफ या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद आमीरने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शाहिन आफ्रिदीने 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow