गुहागर : मोडकाआगर येथे राष्ट्रीय महामार्गावर भर पावसात रस्ता डांबरीकरण

Jun 11, 2024 - 12:41
 0
गुहागर : मोडकाआगर येथे राष्ट्रीय महामार्गावर भर पावसात रस्ता डांबरीकरण

गुहागर : गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मोडकाआगर येथे भर पावसात डांबरीकरण महामार्गाचे ठेका घेतलेल्या मनीषा कंट्रक्शनकडून सुरू आहे. आम्हाला वरिष्ठ पातळीवरून सांगितले आहे असे म्हणत भर पावसात डांबरीकरण करण्यात आले आहे. तर या प्रकरणी पाहणी करून त्यांच्याकडून पुन्हा महामार्गाची दुरुस्ती करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी महामार्गाला तडे गेले आहेत. हे गेलेले तडे चार महिन्यांपूर्वी बुजवण्यात आले. मात्र पुन्हा हे तडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत तर दुसरीकडे मुख्य रस्त्यापासून असलेल्या संलग्न मार्गावर गेल्या दोन दिवसांपासून दुरुस्ती डांबरीकरणाचे काम करण्यात आले. एवढेच नव्हे तर शनिवारी एकीकडे सकाळपासून कोसळणारा पाऊस तर दुसरीकडे डांबरीकरण सुरू होते. मोडकाआगर पुलावर हे डांबरीकरण करण्यात आले असून, काही ठिकाणी खराब काम व रस्त्यावरील भेगा बुजविण्यासाठी हा डांबरीकरणाचा नवा फंडा सुरू करण्यात आला आहे.

व राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्याम खुणेकर यांच्याजवळ अधिक माहिती घेतली असता, या महामार्गाची डागडुजी करण्याचे काम मनीषा कंट्रक्शनचे आहे. मात्र त्यांना भर पावसातून डांबरीकरण करावयास सांगण्यात आले नव्हते असे ते म्हणाले. त्यामुळे जर ते काम निकृष्ट असेल तर पुन्हा ते काम करून घेतले जाईल असे खुणेकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:10 PM 11/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow