लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली : चंद्रकांत पाटील

Jun 11, 2024 - 16:05
 0
लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली : चंद्रकांत पाटील

मुंबई : देशात लोकसभा निवडणुका संपल्या. ४ जून रोजी निकाल समोर आले असून एनडीएला बहुमत मिळाले आहे. भाजपासाठी महाराष्ट्रातील निकाल धक्कादायक लागला आहे. राज्यात भाजपाला फक्त ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९ जागा मिळवल्या आहेत. दरम्यान, आता निकालावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

काही दिवसापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एनडीए'मध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक खिडकी उद्धव ठाकरेंसाठी उघडी असेल असं विधान केले होते. दरम्यान, आता भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाने जोरदार चर्चा सुरू आहेत.

चंद्रकांत पाटलांकडून ठाकरेंचे कौतुक

एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,शिवसेनेला भाजपा सोबत असताना २३ जागा लढायला मिळाल्या, आणि त्यातील १८ जागा त्यांनी जिंकल्या आहेत.आता लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंनी जास्त मेहनत घेतली आहे. एक मित्र या नात्याने मला भीती वाटायची, त्यांना आजारपण होतं. ते खूप फिरले होते, असं कौतुकही पाटील यांनी ठाकरेंचे केले.

"२०१९ युती कायम झाली असती तर ज्यांनी घरला जायचं होतं त्यांच्या १३ आणि ८ जागा निवडून आल्या. उद्धव ठाकरेंनी आता आत्मपरिक्षण केलं पाहिजे, एवढं सगळं करुन काय मिळवलं. एका बाजूला १८ जागांच्या जागेवर ९ जागा झाल्या. दुसऱ्या बाजूला अल्पसंख्यांकाच्या मतांवर विजयी झाले हा ठपका पडला, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. २०१९ ला एकत्र राहिले असते तर ही वाताहत झाली नसती, याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला आहे. उद्धव ठाकरेंनी विश्लेषण केले पाहिजे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:33 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow