'तुझेच मी गीत गात आहे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Jun 11, 2024 - 15:56
 0
'तुझेच मी गीत गात आहे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गात गात आहे' ही मालिका जवळपास २ वर्षानंतर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. छोट्या पडद्यावरील या मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अभिनेता अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, प्रिया मराठे तसेच तेजस्विनी लोणारी यांसारखी तगडी स्टारकास्ट या मालिकेत पाहायला मिळाली. पण ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जुन्या मालिकांची जागा नव्या मालिका घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने मालिकेच्या सेटवरचे फोटो शेअर करत याबाबत खुलासा केल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहलंय, 'काही शो Success देतात; काही Satisfaction .. "तुझेच मी गीत गात आहे" ने दोन्ही दिलं.. Miss you', असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

दरम्यान, चॅनेलकडून 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेचा शेवटचा एपिसोड कधी प्रसारित होणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर अभिनेत्री शिवानी सुर्वेची 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका १७ जूनपासून प्रसारित होणार आहे. यात शिवानी सुर्वेसोबत 'सुदंरा मनामध्ये भरली' फेम अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow