Breaking : खेड तालुक्यात दरड कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला

Jun 11, 2024 - 16:18
 0
Breaking : खेड तालुक्यात दरड कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला

खेड : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यातील अस्तान-धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याची (landslide) घटना घडली. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्यानं बांदरी पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

ही घटना काल मध्यरात्री घडली आहे. तेव्हापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

दोन दिवसांपासून खेड तालुक्यात जोरदार पाऊस सुरु

गेल्या दोन दिवसांपासून खेड तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या कोसळणाऱ्या पावसामुळं दरड कोसळली आहे. तीन वर्षांपूर्वी याच परिसरात घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 18 गाव बांदरी पट्ट्यात असणाऱ्या अस्तान- धनगरवाडी या ठिकाणी डोंगरावर भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळली आहे. ही दरड मुख्य रस्त्यावरती सोमवारी मध्यरात्री कोसळली. त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

भूस्खलनामुळं परिसरात भीतीचं वातावरण

अस्तान गावासोबतच वडगाव, बिरमनी ही गावे देखील दरडग्रस्थ गावे आहेत. भूस्खलनामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत देखील याच गावाशेजारी असणाऱ्या परिसरात दरड कोसळून दोन जणांचा जीव गेला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:46 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow