रत्नागिरी : वीरश्री ट्रस्ट, धन्वंतरी रुग्णालयातर्फे हातखंबा, चांदेराईत आशा सेविकांना मार्गदर्शन

रत्नागिरी : येथील वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून हातखंबा प्राथमिक आरोग्यकेंद्र आणि चांदेराई प्राथमिक आरोग्यकेंद्रात आशा सेविकांचे मार्गदर्शन शिबिर झाले. या वेळेला आशा सेविकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालय सातत्याने रत्नागिरीतील आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून गावातल्या घराघरात पोहोचणाऱ्या आशा सेविकांना आरोग्यविषयक अत्याधुनिक माहिती देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी हातखंबा प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका माने, आरोग्य सहाय्यक झोरे, आरोग्य सहाय्यिका देसाई, आशा पवार, गटप्रवर्तक तन्वी बोरकर आणि सायली शेट्ये उपस्थित होते.

आशा सेविकांना विविध विषयांवर त्यातही वंध्यत्व या विषयावर आवर्जून मार्गदर्शन करण्यात आले. आशा सेविका या ग्रामीण भागातील घराघरातल्या आरोग्यक्षेत्राच्या दुवा आहेत. तेथील ज्येष्ठ नागरिक, मुलं आणि विशेषतः महिलांच्या आरोग्याची काळजी या आशा सेविका घेत असतात. त्यामुळे त्यांचे या समाजातले स्थान महत्वाचे आहे, असे सांगण्यात आले. चांदेराई प्राथमिक आरोग्यकेंद्र येथे सुद्धा आशा सेविका मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी आणि गटप्रवर्तक एच. डी. इंदुलकर उपस्थित होते. वीरश्री ट्रस्ट आणि रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरकडून प्रशासकीय विभागाचे शैलेश धुळप, एम्ब्रियोलॉजिस्ट श्वेता कदम, परिचारिका प्रियांका मासये उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 31-10-2024

ronic