आज इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी भाजपावर बंदी घातली असती : अशोक गहलोत

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जयपूरमधील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केली. यावेळी त्यांनी सध्या देश कठीण परिस्थितीतून जात आहे, असे सांगितले.

भाजपाकडून लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवर कब्जा केला जात असल्याचा आरोप केला. तसेच आज इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी भाजपावर बंदी घातली असती, असा दावाही गहलोत यांनी केला.

अशोक गहलोत म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी मोठा संघर्ष केला. त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. मात्र खलिस्तान बनू दिलं नाही. जर आज इंदिरा गांधी हयात असत्या तर त्यांनी भाजपावर निर्बंध घालण्यासारखी कठोर कारवाई केली असती, असे सांगितले.

यावेळी धर्माच्या आधारावर मतं मागणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचं आहे, असे अशोक गहलोत यांनी माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचं उदाहरण देऊन सांगितले. ते म्हणाले की, माझ्या दीर्घ राजकीय जीवनात मी असं वातावरण आधी कधीच पाहिलं नाही. जर वेळीच परिस्थिती सुधरली नाही तर देशाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 15-06-2026