मुंबई: राज्यातील शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देत शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबत सूचना जारी केली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदा आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा कमी प्रवेश झाल्याने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील ८,७०१ खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख ८९ हजार २८६ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
पहिल्या फेरीत १२ हजार प्रवेश निश्चित
पहिल्या फेरीत २०,७९६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी १२,९३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तर दुसऱ्या फेरीत ५,७०४ अर्जांची निवड करण्यात आली असून १३ जूनपर्यंत २,८५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. पहिल्या फेरीच्या तुलनेत दुसऱ्या फेरीत अर्ज निवड कमी संख्येने तसेच प्रवेश कमी संख्येने झाल्याचे चित्र आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 17-06-2026














