घड्याळाची टिक टिक बंद करा : विनायक राऊत

संगमेश्वर : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आधी करून दाखवलं उराणि मग सांगितलं. नुसत्या भूलथापा मारलेल्या नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीत सर्वांनी तुतारी एवढ्या जोराने फुंकायची आहे की, त्यामुळे घड्याळाची टिक टिक बंद झाली पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे (ठाकरे गट) सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी देवता येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.

देवरुख मराठा भवन येथे हा मेळावा झाला. महाविकास आघाडीचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी संगमेश्वर तालुका कार्यकर्ता मेळावा झाला. या वेळी राऊत म्हणाले, राज्यात महागाई गगनाला भिडत चालली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. असे अनेक प्रश्न जैसे थेच आहेत. आताच्या सरकारने विकास केला तो नेमका कोणता आणि कोणाचा केला. या सरकारने महाराष्ट्र लुटण्याचे आणि जातीधर्मामध्ये राजकारण करून महाराष्ट्र उद्‌ध्वस्त करण्याचे काम केले आहे. जे उद्धव ठाकरे व शरद पवारांमुळे मोठे झाले, ते आज त्यांनाच संपविण्याची भाषा करत आहेत. त्यांना संपविणारी औलाद अजून जन्माला आली नाही. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणे, कोकणाला पूरक असे उद्योग आणणे आणि बहिणींच्या रक्षणासाठी सध्याच्या सरकारला काहीच करता आले नाही, त्यासाठी आमचे सरकार विशेष पाऊल उचलेल, असा विश्वास त्यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 08/Nov/2024

ronic