रत्नागिरीत जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा संपन्न

रत्नागिरी : राज्य क्रिडादिनानिमित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा कुस्ती असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा १२ डिसेंबर रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी येथे पार पडल्या.

पैलवान खाशाबा जाधव जयंतीचे औचित्य साधत राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्ह्यातील कुस्तीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डाव प्रतिडावांनी रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी संस्कार लटके, मारूती बिरजे, आनंद तापेकर, तेज जावळे, साहिल खटकुळ, अथर्व घोले, रोहित चिले, अतुल गराटे, साहिल धांगडे, भावेश सावंत तर महिला गटात सायली यादव, कमल नितोरे, सायली लटके, सानिया कांबळी विजयी झाल्या. कुमार गटात मैथिली शिनगारे, तन्वी सागवेकर, रीया आग्रे, शमिका कदम, किर्ती सावंत, मेहबुब शेख, राजेश रब्बी, शौर्य जाधव, वेदांत नागले, यश जावळे, नियाज मुल्लानी, गौरव नागले, वरद ताम्हणकर, दुर्वांक नागले हे विजयी झाले.

यावेळी व्हॉलीबॉल मार्गदर्शक गणेश खैरमोडे, जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी, कार्यवाह डॉ. चंद्रशेखर केळकर, उपाध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष अमित विलणकर, आनंद तापेकर, योगेश हरचेकर, वैभव चव्हाण, फैयाज खतिब, निलम कुलकर्णी, राज नेवरेकर, अंकुश कांबळे, स्वप्निल घडशी आदी उपस्थित होते.

Mahrashi karve ANM

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 15-01-2025