रत्नागिरी : कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचा २५ जानेवारीला स्नेहमेळावा

रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेहमेळावा येत्या शनिवारी (दि. २५ जानेवारी) सायंकाळी ४.०० वाजता साईनगर येथील श्री साईमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

स्नेहमेळाव्याला ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष मारुती अंब्रे आणि उपाध्यक्ष राजेंद्र कदम यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 23-01-2025

Infigo Eyecare