आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यात गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शतकी खेळी करत वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला होता.

दरम्यान, वैभव सूर्यवंशीने आज बिहारमधील पाटणा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींची भेट घेतल्यावर वैभव सूर्यवंशीने त्यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले.

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने एकूण ७ सामने खेळले होते. त्यात त्याने ३६ च्या सरासरीने २५२ धावा काढल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा २०६.५५ एवढा राहिला. तसेच वैभव सूर्यवंशीने एकूण १२२ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार आणि २४ षटकारही ठोकले.

आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर वैभव सूर्यवंशीचे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे आयपीएल २०२५ च्या लिलावामध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी विविध फ्रॅन्चायझींमध्ये चढाओढ लागली होती. वैभव सूर्यवंशीचा बेस प्राईस ३० लाख होती. अखेरीस राजस्थान रॉयल्सने त्याला १.१० कोटी रुपयांना खरेदी केले होते.

Mahrashi karve ANM

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:51 30-05-2025