चंद्रपूर जिल्हा न्यायालयात ‘शिपाई’ पदांसाठी भरती: ७वी पास उमेदवारांना संधी!

चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने ‘शिपाई’ (Sweeper) पदांच्या ५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ७वी पास असलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जून २०२५ आहे.

भरतीचा तपशील:

  • संस्थेचे नाव: जिल्हा न्यायालय चंद्रपूर
  • पदाचे नाव: शिपाई (Sweeper)
  • रिक्त जागांची संख्या: ५
  • नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर, महाराष्ट्र
  • श्रेणी: सरकारी नोकरी

शैक्षणिक पात्रता आणि वेतन:

  • शैक्षणिक पात्रता: ७वी उत्तीर्ण.
  • वेतनश्रेणी: दरमहा ₹१५,०००/- ते ₹४७,६००/-.

वयोमर्यादा:

Pednekar sankul

  • किमान वय: १८ वर्षे
  • कमाल वय: ३८ वर्षे
  • वयात सवलत: राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षांची वयात सवलत.

निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे (Interview) केली जाईल.

अर्ज शुल्क:

  • सर्व उमेदवारांसाठी: ₹३००/-
  • शुल्क भरण्याची पद्धत: डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) द्वारे.

अर्ज कसा करावा: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित (self-attested) छायाप्रतींचा एक सेट तयार करावा. हा अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा:

व्यवस्थापक, जिल्हा आणि सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), बस स्टँड समोर, चंद्रपूर-४४२४०१.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सादर करण्याची सुरुवात: २३ मे २०२५
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १० जून २०२५

महत्त्वाच्या लिंक्स:

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.