चिपळुणात आजपासून 'नदी की पाठशाला' कार्यशाळा

Jun 21, 2024 - 10:53
Jun 21, 2024 - 12:56
 0
चिपळुणात आजपासून 'नदी की पाठशाला' कार्यशाळा

चिपळूण : 'चला जाणूया नदीला' अभियान, जलबिरादारी, महाराष्ट्र शासन आणि चिपळूण न.प.च्या वतीने दि. २१ ते २३ दरम्यान चिपळुणात 'नदी की पाठशाला' या निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत प्रसिद्ध जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग यांच्यासह राज्यातील तज्ज्ञ मान्यवर सहभाग घेणार आहेत.

डीबीजे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी ९ वा. या कार्यशाळेचे उद्घाटन होईल. दि. २१ जून रोजी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक आर्दीच्या उपस्थितीत जलपूजन होईल. १० वा. कोकणातील नद्यांची भूरचना' या विषयावर  वडगबाळखर यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर 'कोकणातील नद्या कशा समजून घ्याव्यात' या बाबत शैलजा देशपांडे मार्गदर्शन डॉ. राजेंद्र सिंग करतील. पुराची संभाव्य कारणे या विषयावर अभियंता महेश काळे यांचे व्याख्यान होईल, 'पूर निसर्गनिर्मित की मानवनिर्मित' या विषयावर कर्नल सुपनेकर, शाहनवाज शाह, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उपस्थितीत चर्चा होईल, दुपारनंतर प्रदूषणाची कारणे, तीव्रता व परिणाम या विषयावर कोल्हापूरचे उदय गायकवाड मार्गदर्शन करतील. त्यानंतर प्रदूषणाचे मोजमाप या विषयावर मार्गदर्शन होईल. सांडपाणी व सामाईक प्रदूषण आणि व्यवस्थापन या विषयी  डॉ. अजित गोखले, अरविंद म्हात्रे यांचे मार्गदर्शन होईल.

दि. २२ रोजी सकाळी ६:३० वा. नदीभेट कार्यक्रम, दु. १ वा. औद्योगिक संस्थांना भेट, सायंकाळी ५ वा. नदीं की पाठशाला या विषयावर खुली चर्चा होईल, दि. २३ रोजी सकाळी ८ वा. लोकसंवाद होईल. त्यानंतर 'कोकणातील कोंडी' या विषयी डॉ. सुमंत पांडे, अजित गोखले व युयुत्सु आर्ते मार्गदर्शन करतील. यानंतर कोकण खोरे संचालक कपोले, मल्हार पाटेकर, गणेश थोरात यांचे मार्गदर्शन होईल. दु. १ वा. जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग यांचे 'नदीचे आरोग्य आणि मानवी आरोग्य यांचा संबंध' या विषयावर मार्गदर्शन होईल.

राज्यभरातील अभ्यासकांचा सहभाग
कोकणातील नद्यांबाबत व्यापक जनजागृती व्हावी लोकांमध्ये नद्या संवर्धनाबाबत जागरूकता यावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणस्तरीय ही कार्यशाळा असून राज्यातील अनेक मान्यवर अभ्यासक या कार्यशाळेत सहभाग घेणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 21/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow