राजापूरात आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत; काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

Jul 16, 2024 - 10:34
Jul 16, 2024 - 14:09
 0
राजापूरात आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत; काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

राजापूर : तालुक्यातील आरोग्य केंद्रामध्ये अपुरा कर्मचारी असल्याने तालुक्यातील आरोग्यसेवा कोलमडली आहे. याचा फटका जास्त करून शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे तालुक्यातील आरोग्य केंद्रातील रिक्तपदे त्वरित भरावीत, अशी मागणी राजापूर तालुका काँग्रेसच्यावतीने निवेदनामार्फत राजापूर तहसीलदार यांच्याकडे केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, विधान परिषद माजी आ. हुस्नबानू खलिफे उपस्थित होत्या.

राजापूर तालुक्यातील आरोग्य सेवा केंद्रांतर्गत असणाऱ्या उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर व इतर पदे रिक्त असून, याचा परिणाम संपूर्ण यंत्रणेवर होत आहे. कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना पुरेशी सेवा उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्रदेखील उपस्थित होत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली. लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन रुग्णांची होणारी गैरसौय दूर करावी, अशी मागणी केली यावेळी राजापूर तालुका अध्यक्ष किशोर नारकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:17 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow