देवरूख नगरपंचायतीकडून 'लाडकी बहीण' योजनेसाठी गृहभेट उपक्रमांचे आयोजन

Jul 12, 2024 - 12:09
 0
देवरूख नगरपंचायतीकडून 'लाडकी बहीण'  योजनेसाठी गृहभेट उपक्रमांचे आयोजन

साडवली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देवरूखात गृहभेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका, बचतगटांच्या अध्यक्षा यांच्या सभा बोलावून योजनेची जनजागृती करणेच्या उद्देशाने आवश्यक ती सर्व माहिती देऊन अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे.

नगरपंचायत कार्यक्षेत्रामधील १३ अंगणवाड्यांमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी बूथ स्थापन केले असून सदरचे बूथ सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहेत. तसेच नगरपंचायत कार्यालयामध्ये कार्यालयीन पूर्ण वेळेसाठी सुटीच्या दिवसांसह एक बूथ स्थापन केला आहे. तसेच, नगरपंचायतीचे वॉर्ड अधिकारी व अंगणवाडी सेविका या ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याचे काम बूथवर करत आहेत. त्याचप्रमाणे गृहभेटी देऊन गृहभेटीद्वारे जनजागृती करणे व अर्ज भरून घेणे हा उपक्रम नगरपंचायतीद्वारे राबवण्यात येत आहे. 

पात्र लाभार्थीना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणच्या बूथवर तसेच गृहभेटीदरम्यान त्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे. तसेच अधिकाधिक पात्र लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे. नोडल अधिकारी श्रीमती भाटकर व सहाय्यक नोडल अधिकारी सरवदे हे या योजनेच्या अंमलबजावणीकरिता बुथनिहाय कामाचा तसेच गृहभेट उपक्रमाचा दैनंदिन आढावा घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 12/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow