आंजणारी घाटात महिलांना चिरडणाऱ्या ट्रेलर चालकाला कारावास

Jul 15, 2024 - 14:35
 0
आंजणारी घाटात महिलांना चिरडणाऱ्या ट्रेलर चालकाला कारावास

लांजा : दोन महिलांना चिरडून त्यातील एकीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रेलर चालकाला लांजा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ही दुर्घटना २३ नोव्हेंबरला सकाळी आंजणारी घाटात घडली होती.

आंजणारी पेंढारीवाडी येथील रहिवासी असलेल्या दोन महिला नेहमीप्रमाणे सकाळी शेतीच्या कामासाठी चालल्या होत्या. त्या वेळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने या दोघींना धडक दिली. हा ट्रेलर सद्दाम हकीमुद्दिन अन्सारी (वय २६, रा. बिहार) हा चालवत होता. या ट्रेलरने पल्लवी प्रकाश पेंढारी (वय ४७, रा. आंजणारी) या महिलेला अक्षरशः चिरडले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता, तर जयश्री धोंडू पेंढारी (वय ५५) या गंभीर जखमी झाल्या होत्या.

या अपघातप्रकरणी लांजा न्यायालयाने ट्रेलर चालक सद्दाम हकिमुद्दीन अन्सारी याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. दिवाणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी (वर्ग-१) पी. आर. भोसले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील म्हणून श्रीमती प्रतिभा पवार यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow