Ratnagiri : जिल्हा नियोजनच्या ३६० कोटींच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी

Jul 16, 2024 - 11:49
 0
Ratnagiri : जिल्हा नियोजनच्या ३६० कोटींच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितच्या गतवर्षीच्या ३०० कोटीचा वार्षिक आराखड्यातील १०० टक्के निधी खर्च झाला. २०२४-२५ साठीच्या ३६० कोटीच्या वार्षिक आराखड्याला या बैठकीत मंजूरी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यातील ७५ टक्के निधी लवकरात लवकर खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

यावेळी खासदार सुनिल तटकरे, आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, आदी ऑनलाईन पद्धतीने तर आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकीरण पूजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह समितीचे निमंत्रित सदस्य, अधिकारी वर्ग उपस्थित होते.

जिल्हा नियोजने समितीच्या नवीन सभागृहाचे उद्गाटन होऊन पहिलीच सभा या सभागृहामध्ये झाले. सभागृहाचे काम एवढे अलिशान झाले आहे की मिनी विधानसभेमध्ये बसल्याचा आनंद मिळतो. जिल्हा नियोजनच्या विषयपत्रिकेला अनुसरून सभा सुरू झाली. मागील गेल्या सभेचे इतिवृत्ताला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजनच्या २०२४-२५ च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. विशेष घटक योजना २०२४-२५ च्या प्रारुप आराखड्यास यावेळी मान्यता दिली. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील २०२४-२५ व्या आराखड्यास सभागृहाने मंजूरी दिली. २०२३-२४ डिसेंबर २०२३ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला. यावेळी ३०० कोटीच्या १०० टक्के निधी खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत कामाच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील २०२३ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीच्या २०२४-२५ च्या आर्थिक वर्षासाठीच्या ३६० कोटीच्या आराखड्याला मंजूरी मिळण्यासाठी आजची बैठक बोलाविली आली होती. आराखडयातील मंजूर नियतव्ययाची विगतवारी करताना नाविन्यपूर्ण योजना व मुल्यमापन याबाबीसाठी १३.७० कोटी तरतुद असून गाभा क्षेत्रासाठी १७९.५३ कोटी तरतुद आहे. यासाठीची मागणी ४६४.२० कोटी इतकी आहे. तर बिगर गाभा क्षेत्रासाठी तरतूद ८६.७७ कोटी असून मागणी २८७.६६ कोटी आहे. जिल्हयाची जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ ची एकूण मागणी ७६५.५६ कोटी असून ४८५.५६ कोटी इतकी अतिरिक्त मागणी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

जिल्हयातील ग्रामीण रस्ते आणि साकवसाठी अधिक निधीची तरतूद करावी तसेच लवकरच आचारसंहीता लागण्याची शक्यता असल्याने तरतुदीप्रमाणे सर्व यंत्रणानी तांतडीने खर्च करावा, अशा सूचना करण्यात आल्या. ग्रामीण रस्ते, जनसुविधा या योजनांवर निधी खर्च होईल याकडे लक्ष दयावे. साकव आणि रस्ते साठी प्रत्येकी ४० लाख याप्रमाणे तरतूद ठेवावी अशी यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow