संगमेश्वर : करंबेळेत वडाचे झाड कोसळले

Jul 16, 2024 - 10:16
Jul 16, 2024 - 12:02
 0
संगमेश्वर : करंबेळेत वडाचे झाड कोसळले

संगमेश्वर : संगमेश्वर देवरुख मार्गावर करंबेळे येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वडाचे झाड कोसळले. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. स्थानिक ग्रामस्थ आणि कामगारांनी विशेष मेहनत घेत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. सुदैवाने, कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नसल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसाने ठिकठिकाणी पडझड सुरू आहे. सोमवारी पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होत आहे. 

संगमेश्वर कोल्हापूर राज्यमार्गावर संगमेश्वर ते साडवली दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अनेक जुनी झाडे आहेत. काही दिवसांपूर्वी करंबेळे येथे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वणव्यामुळे झाडे जीर्ण झालेली आहेत. आज दुपारी भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे देवरुखकडे जाणारी वाहतूक आणि संगमेश्वरकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरून नियमित वाहतूक सुरू
असते. सुदैवाने, झाड कोसळले तेव्हा तेथून कोणीच जात नव्हते. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाचे कामगार यांनी झाड तोडले. या प्रकारामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प होती. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow