Dam Water Storage : कोकण विभागातील धरणांत ६०.६८% पाणीसाठा

Jul 18, 2024 - 16:03
 0
Dam Water Storage : कोकण विभागातील धरणांत ६०.६८% पाणीसाठा

मुंबई : १८ जुलै 2024 रोजी चा राज्याच्या प्रमुख धरणांमधील (Maharashtra Dam Water Storage) एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे ४७३.९२ टीएमसी म्हणजेच ३३.१३% इतका आहे. कोकण व अमरावती (Konkan and Amaravati) विभागामध्ये सर्वात जास्त प्रकल्पीय पाणीसाठा अनुक्रमे ६०.६८% व ४३.९८% इतका असून मराठवाडा (Marathwada) विभागात सर्वात कमी प्रकल्पीय पाणीसाठा म्हणजे ११.४६% टक्के इतकाच आहे.

जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी हे निरीक्षण सांगितले आहे.

राज्यातील प्रमुख धरणांचा (साठवण क्षमतेनुसार)एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे 1430.63 टीएमसी इतका आहे.

  • 1)नागपूर विभागाचा प्रकल्पीय पाणीसाठा हा अंदाजे १६२.७० टीएमसी इतका आहे असुन आज रोजी तो अंदाजे ६७.८४ टीएमसी म्हणजेच ४१.६९%इतका आहे.
  • 2) अमरावती विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा १३६.७५ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा हा अंदाजे ५८.७५ टीएमसी म्हणजे ४३.९८% इतका आहे .
  • 3) मराठवाडा विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे २५६.४५ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे २९.३८ टीएमसी म्हणजेच ११.४६% टक्के इतका आहे.
  • 4) नाशिक विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा २०९.६१ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे ५७.३९ टीएमसी म्हणजेच २७.३७% इतका आहे .
  • 5) पुणे विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा ५३७.२८ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे १८१.१३ टीएमसी म्हणजेच ३३.७२% इतका आहे .
  • 6) कोकण विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा १३०.८४ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा अंदाजे ७९.४१ टीएमसी इतका म्हणजेच ६०.६८% इतका आहे.

राज्याला अजूनही मोठ्या पावसाची (Heavy rain) आवश्यकता व प्रतिक्षा असून यापुढे उर्वरित अडीच ते तीन महिन्याच्या पावसाळा कालावधीत निश्चितपणे चांगला पाऊस पडून धरणे भरतील असा पूर्वीच्या पर्जन्यमान आकडेवारीवरून अंदाज करायला हरकत नसल्याचे श्री. चकोर यांनी सांगितले.

विशेष म्हणजे यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आजपर्यंत उजनी (Ujani Dam) धरणात 18.29 टीएमसी इतके व कोयना धरणामध्ये 13.23 इतके नवीन पाणी आले आहे.

कोकण प्रदेश, पुणे , नागपूर ,अमरावती या विभागांतील धरण पाणी साठ्यात देखील लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र मराठवाडा विभागासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात अत्यल्प वाढ होत असून ती चिंतेची बाब आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटमाथ्यावर देखील पावसाचे प्रमाण( घाटघर, हरिश्चंद्रगड ,रतनवाडी, भंडारदरा ) दरवर्षीपेक्षा कमी झालेले निदर्शनास येत आहे. परंतु या पुढील काळात अजूनही पुढील दोन महिन्यात पुरेसा पाऊस पडून धरणे भरू शकतात.

कोकणघाट माथ्यावरील पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी प्राधान्याने गोदावरी खोरे(115TMC), कृष्णा खोरे व तापी खोऱ्यामध्ये वळविणे अत्यंत गरजेचे असून त्या दृष्टीने राज्य व केंद्र सरकारने तातडीने पाणी वळविण्याचा कार्यक्रम अथवा नदी जोड प्रकल्प हाती घेऊन पावसाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या विभागांत व पाणी तुटीचे खोऱ्यांमध्ये पाणी वळविणे हे भविष्यात शेतीचे सिंचनासाठी व पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपयुक्त व अनिवार्य असल्याचे देखील श्री. चकोर यांनी अधोरेखित केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:31 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow