संगमेश्वर : माखजन बाजारपेठेत घुसले गडनदीच्या पुराचे पाणी

Jul 22, 2024 - 10:19
Jul 22, 2024 - 11:25
 0
संगमेश्वर : माखजन बाजारपेठेत घुसले गडनदीच्या पुराचे पाणी

संगमेश्वर : मुसळधार पावसामुळे गडनदीला पुन्हा पूर आला होता. त्यामुळे गडनदीच्या पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसले. गेले १५ दिवस गडनदीचे पाणी कमीजास्त प्रमाणात माखजन बाजारपेठेत येत आहे. रविवारी पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने माखजन चाजारपेठेत अनेक दुकानांत हे पाणी शिरले. 

इथल्या व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे बघायला शासनाला वेळ नाही का, असा संतप्त स्वाल माखजनचे सरपंच महेश बाष्टे यांनी केला आहे.  गेले १५ दिवस सतत भरणाऱ्या पाण्यामुळे येथील व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात भिजला आहे. शिवाय मंदीमुळे धंदाही झालेला नाही. अशा स्थितीत येथीलव्यापाऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यायला नको का, असा जाब महेश बाष्टे यांनी विचारला आहे.

आमदार शेखर निकम यांनी डीझेलच्या खर्चासाठी ९ लाख मंजूर करून आणले, परंतु गाळ काढण्यासाठी आवश्यक मशिनरी उल्लब्ध न झाल्याने गडनदीमधील गाळ काढण्याचा विषय प्रलंबित आहे. गदीमधील पुरामुळे माखजन कासे पुलाच्या दुतर्फा पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. कासे, पेढाबे, नारडुवे, असावे, कळंबुशी, शिरंबे आदी गावांचा संपर्क तुटता आहे. गेले १५ दिवस गहनदी लगत असलेल्या करजुवे, धामापूर, माखजन, सरंद, बुरंबाड, कोंडीवरे, आरवली आदी गावांतील नदीलगतची भातशेती पाण्याखाली राहिल्याने शेती कुजून गेली आहे. या भागात पिकांची तत्काळ पाहणी व्हावी, अशी मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow