Ratnagiri : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा जागर

Jul 22, 2024 - 14:21
Jul 22, 2024 - 14:27
 0
Ratnagiri : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा जागर

रत्नागिरी : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित २२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या २५०० शाळांमध्ये यानिमित्त शिक्षणाचा जागर होणार आहे. यावेळी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या वर्धापन दिनानिमित शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत, जिल्हा परिषद प्राथमिक विभाग जिल्ह्यातील २५०० शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यास सज्ज झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार चांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकारी बी एम. कासार यांनी प्रत्येक शाळेत हा उपक्रम कशा पद्धतीने राबवावा, याची लेखी सूचना केली आहे. यामुळे हा सप्ताह जल्लोषात साजरा होणार आहे.

या सप्ताहाची सुरवात सोमवारी दि.२२ जुलै रोजी होणार आहे. अध्ययन व अध्यापन साहित्य दिवस अंतर्गत या दिवशी कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे, खेळणी कागदापासून तसेच बांबूच्या कड्यापासून खेळणी बनवणे, वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे, वाचन कट्टा व कथाकथन सत्र याचे आयोजन करण्यात येणार आहे. २३ जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व शास्त्रदिवस अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्यादृष्टीने जाणीव जागृती करणे, कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ज्ञांच्या गोष्टीचे सत्र आयोजित करणे आदी कार्यक्रम होणार आहेत.

बुधवारी, २४ जुलै रोजी क्रीय दिवसांतर्गत खेळ आणि तंदुरुस्तीच्या मह्त्त्वाबाबत जागरुकता वाढवणे देशी खेळांना प्रोत्साहन देणे, खिलाडूवृत्ती व नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे, विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करणे आदी कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवारी २५ जुलै रोजी सांस्कृतिक दिनांतर्गत कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांची वारावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनवणे, नृत्य, गाणी, नाटक, पारंपरिक कला नाटिका, सादरीकरण करणे  

२६ जुलै रोजी कौशल्य व डिजिटल यांचे उपक्रम दिवसांतर्गत विद्यार्थी संवाद कौशल्य, विक्री कौशल्य याचे सादरीकरण मॉकमार्केटिंग कॅम्पन डेव्हलपमेंट, ग्राहक ओळख, निश्चितीकरण व बाजार संशोधन, सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती, निसर्ग व शेतीतून अध्ययन, घरगुती कामातून शिकणे, मातीकाम कौशल्य आदी उपक्रम, २७ जुलै रोजी मिशन लाईकच्या हटिक्षेपात इको क्लब उफक्रमांतर्गत तसेच शालेय पोषणा दिवसांतर्गत शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे, वृक्षारोपण मोहीम हाती घेणे तर २८ जुलै रोजी शाळांचे सक्षमीकरण करणे, शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातीसंबंध प्रस्थापित करणे, समाजातील घटकांमध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण करणे आदी कार्यक्रम होणार आहेत.

शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून यामधील शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह, विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे. बी.एम. कासार शिक्षण अधिकारी, जि.प. रत्नागिरी


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow