चिपळूण पालिकेचे भंगार व्यावसायिकाने थकवलेयत दीड लाख

Jul 22, 2024 - 11:06
Jul 22, 2024 - 16:21
 0
चिपळूण पालिकेचे भंगार व्यावसायिकाने थकवलेयत दीड लाख

चिपळूण : दोन वर्षांपूर्वी लिलावाने घेतलेल्या बाजारपुलाच्या लोखंडाचे सुमारे दीड लाख रुपये संबंधित भंगार व्यावसायिकाने थकवले आहेत. तो पैसे भरण्यास टाळाटाळ करत असल्याने त्याला पालिकेने नोटीसही दिली आहे. तरीही तो लक्ष देत नसल्याने हे पैसे बुडीत जाण्याची शक्यता आहे.

चिपळूण पालिकेने काही वर्षांपूर्वी वाशिष्ठी नदीवर नवा बाजारपूल बांधला आहे. त्यानंतर बरीच वर्षे जुना बाजारपूल तसाच उभा होता. तो वाहतुकीसाठी बंद ठेवून केवळ नागरिकांना ये-जा  करण्यासाठी खुला ठेवण्यात आला होता; मात्र २०२१ च्या महापुराला हा पूलही कारणीभूत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे नागरिक व व्यापाऱ्यांनी केल्या. त्यानुसार दोन चर्षांपूर्वी सुमारे ५ लाख रुपये खर्च करून हा पूल तोडण्यात आला. ठेकेदाराला केवळ तोडण्याचेच काम दिले गेल्याने यातून निघालेले हजारो टन लोखंड पालिकेकडे जमा करण्यात आले. त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन नगर अभियंता परेश पवार व बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांनी त्याचा लिलाव केला; मात्र ज्या भंगार व्यावसायिकाने हे लोखंड उचलले. त्या व्यावसायिकाने त्याचे सुमारे दीड लाख रुपये अद्यापही पालिकेत भरणा केलेले नाहीत.

हा प्रकार काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी संबंधिताकडे संपर्क केला; मात्र तो त्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून आल्याने त्याला नोटीस देण्यात आली आहे.

जुना बाजारपूठ लोखंड लिलावाचे पैसे का रखडले, हे सांगता येणार नाही: वसूल करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आल्या असून, संबंधित भंगार व्यावसायिकाला नोटीस देण्यात आली आहे. - प्रणोल खताळ, नगर अभियंता, चिपळूण पालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow