रत्नागिरी : डिझेल परताव्यापोटी ६ हजार ९०८ लाभार्थ्यांना ५ वर्षांत १४३ कोटी रुपये वितरित

Jul 23, 2024 - 10:19
Jul 23, 2024 - 10:26
 0
रत्नागिरी : डिझेल परताव्यापोटी ६ हजार ९०८ लाभार्थ्यांना ५ वर्षांत १४३ कोटी रुपये वितरित

रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छीमार नौका मालकांना गेल्या पाच वर्षात डिझेल परताव्यापोटी ६ हजार ९०८ लाभार्थ्यांना १४३ कोटी ७५ लाख रुपये देण्यात आले. जिल्ह्यातील मासेमारी गेल्या काही वर्षांमध्ये तोट्यात चालली आहे, नौकेच्या खर्चानुसार मासळी मिळण्याचे प्रमाण फारच कमी होते. अशावेळी नौका मालकांचे काही प्रमाणातील नुकसान कमी व्हावे यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी शासनाकडून विक्री कर परतावा किंवा डिझेल प्रतिपूर्तीची रक्कम म्हणून शासनाकडून मिळवून दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे प्रमाण दरवर्षी कमी जास्त होत असते. मत्स्य व्यवसाय विभागाकडील गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार ८५ सहकारी संस्था होत्या. त्यावेळी एकूण २५२० नौकांपैकी २०७४ यांत्रिकी नौका आहेत. एकूण संस्थांपैकी सरासरी ३५ सहकारी संस्थांना डिझेल परताव्याची रक्कम मिळते. गतवर्षी ४७ सहकारी संस्था होत्या. गेल्या ५ वर्षात ६ हजार ९०८ नौका मालकांना डिझेल परताव्याची १४३ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम वितरित झाली आहे. डिझेल परताव्यापोटी गेल्या वर्षी १७ कोटी रुपये वितरित झाले आहे. त्या अगोदरच्या वर्षांमध्ये अनुक्रमे १३ कोटी, २२ कोटी, ३० कोटी आणि ६० कोटी रुपये लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. ही डिझेल परताव्याची रक्कम दरवर्षी मिळावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow