गायक राहत फतह अली खान यांना अटक

Jul 23, 2024 - 10:18
Jul 23, 2024 - 10:18
 0
गायक राहत फतह अली खान यांना अटक

बुर्ज : प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान (Rahat Fateh ali khan) यांस सोमवारी दुबईतील विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. दुबईतील बुर्ज दुबई पोलीस (dubai) स्टेशनमध्ये राहत फतेह अली खान यांच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली होती.

मॅनेजर सलमान अहमद यांच्या तक्रारीनंतर दुबई पोलिसांनी (Police) ही अटकेची कारवाई केली आहे.

दुबईतील एका कॉन्सर्टवरुन गायक राहत फतह अली खान आणि त्यांचा मॅनेजर अहमद सलमान यांच्यामध्ये एका शो संदर्भाने वाद झाला होता. शोचे आयोजन आणि आर्थिक देवाण-घेवाणीवरुन दोघांमधील हा वाद पोलिसांत गेल्यानंतर आता पाकिस्तानी गायकावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, दुबईतील शो केल्यानंतर परतत असताना दुबई पोलिसांनी थेट विमानतळावरुनच गायकास अटक केली आहे.

यापूर्वी नोकरालाही कानशिलात लगावली

दरम्यान, यापूर्वीही गायक राहत फतह अली खान मोठ्या वादात अडकले होते. त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये राहत फतह अली खान एका व्यक्तीला चप्पलेने मारताना दिसले. मात्र, या व्हिडीओची जबाबदारी घेत त्यांनी माफीही मागितली होती. व्हिडिओत राहत फतेह अली खान नोकराला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केले होते. त्यानंतर, अली खान यांना उपरती आली अन् त्यांनी माफी देखील मागितली होती. दारुची बाटली गायब झाल्याने त्यांनी नोकराला चप्पलेने मारहाण करण्यात आल्याची माहिती पुढे आली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 23-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow