चिपळूण : परशुराम घाटात अपघातप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल

Jul 23, 2024 - 11:05
Jul 23, 2024 - 15:11
 0
चिपळूण : परशुराम घाटात अपघातप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी (ता. २०) दुपारी एसटीची दुचाकीला धडक बसून अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीस्वारसह दोघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एसटी चालकावर रविवारी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र पंढरीनाथ शिरसाट (रा. माणूर, ता. कळवण, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या एसटी चालकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीस्वार जयंत काशीनाथ मेटकर (२४, परशुराम पायरवाडी), हर्ष परशुराम मेटकर (१७, परशुराम देऊळवाडी) असे दोघेजण जखमी झाले आहेत. जयंत मेटकर हे दुचाकी घेऊन वालोपे ते परशुराम असे जात होते. त्याचवेळी त्यांना ओव्हरटेक करताना एसटी बसचालकाने अचानक उजव्या बाजूला गाडी घेऊन दुचाकीला धडक दिली. यामध्ये जयंत मेटकर यांच्या हाता-पायाला दुखापत झाली तसेच हर्ष मेटकर याच्या पायाचा अंगठा तुटला असून, उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यानुसार एसटी चालक रवींद्र शिरसाट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow