संगमेश्वर : आकांक्षा कदमला दहाव्यांदा राज्यस्तरीय कॅरमचे विजेतेपद

Jul 25, 2024 - 11:18
Jul 25, 2024 - 16:28
 0
संगमेश्वर : आकांक्षा कदमला दहाव्यांदा राज्यस्तरीय कॅरमचे विजेतेपद

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षाने तब्बल दहाव्या वेळेला राज्यस्तरीय कॅरमचे विजेतपद मिळविले आहे. नुकत्याच चेंबूर जिमखाना व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आकांक्षाने या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कॅरमपटू काजलकुमारी, नीलम घोडगे यांना पराभूत करत दिमाखदार अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तिने मुंबईच्या रिंकूकुमारीचा सरळ दोन सेट मध्ये पराभव करत दहाव्यांदा राज्यस्तरीय कॅरमचे विजेतेपद मिळविले. 

आकांक्षाने तिसऱ्यांदा चेंबूर जिमखान्याचे विजेतेपद मिळविले आहे. आकांक्षा ही अवघी १९ वर्षांची असून, तिला तिचा मामा व आंतरराष्ट्रीय कॅरमपट्ट संदीप देवरूखकर, महेश देवरूखकर, भाऊ यश कदम, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अरुण केदार, यतीन ठाकूर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow