रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे २४ तासांत ६ लाखांचे नुकसान

Jul 26, 2024 - 10:39
Jul 26, 2024 - 10:42
 0
रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे २४ तासांत ६ लाखांचे नुकसान

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पाऊस पडला. बहुतांश तालुक्यात ७५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. पावसाला वाऱ्याचीही जोड असल्याने काही भागात जोरदार पावसामुळे घरांसह गोठ्यांची पडझड होऊन नुकसान झाले. बुधवारच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सहा लाखांची हानी केली.

खेड तालुक्यात मुसळधार पावसात आंब्याचे झाड रिक्षावर उन्मळून पडल्याने सुमारे सव्वातीन लाखाचे नुकसान झाले. मंडणगड तालुक्यातील सडे-गावठाणवाडी येथील लक्ष्मण नाविलकर यांच्या घरावर झाड पडल्यामुळे घराचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दापोली तालुक्यात पाडले येथील समाज सभागृहाचे सिमेंटचे सात पत्रे उडाले. भडवळेतील काशिनाथ सोनू लोंढे यांच्या बंद घराचे पावसामुळे ८ हजार ६५५ रुपयांचे नुकसान झाले.

खेड तालुक्यात कोंडवी येथील प्रकाश डोंगरे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात ओझरे खुर्द बौद्धवाडी येथील सुरेश गोविंद कदम यांच्या गोठ्याचे तीस हजारांचे नुकसान झाले. तेरे-सुतारवाडी येथील महादेव घवाळी यांच्या गोठ्याचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. देवरूख-रामवाळी येथील शारदा बोटके अतिवृष्टीमुळे यांचे घराची भिंत कोसळून २० हजार रुपयांचे नुकसान झाले. डिंगणी पुरण येथील सुरेश कृष्णा राऊत यांच्या घरावर झाड कोसळून १५ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले. दाभोळ येथील जयश्री देवळेकर अतिवृष्टीमुळे यांचे वाङयावर झाड कोसळून २६ हजार ५०० रुपयांची हानी झाली.
संगमेश्वर तालुक्यात माभळे- काष्टेवाडी येथे रस्त्याला भेगा पडल्या आहेत, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. धामापूरतर्फे देवरूख येथील देवरूख कोसुंब-सांगवे रस्त्यावरील सप्रेवाडी बसथांबा प्रवासी निवारा  शेड कोसळली. देवरूख नगरपंचायत हद्दीतील माणिक चौक बाजारपेठ परिसरातील शैलजा गांधी यांच्या मालकीच्या इमारतीवरील पत्र्याचे शेडचे काही पत्रे वादळामुळे उडाले आहेत. रत्नागिरी तालुक्यात जयगड मोहल्ला येथील मेहबूब अतिवृष्टी मुळे यांचे रहाते घर खचले यामधे घराचे नुकसान झाले. कोंडवी येथील प्रकाश डोंगरे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यात यशवंतगड येथील दर्यावर अतिवृष्टीमुळे झाड पडून अंशतः पाच हजारांचे नुकसान झाले. गोवळ खालचीवाडी येथील रंजना पुजारी यांच्या घराचे एक लाखाचे नुकसान झाले. जुवाटी येथील किरण तुळशीदास कांबळे यांच्या घराभोवतीच्या कुंपणाचे दीड हजारांचे नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow