चिपळूण : गोवळकोट जिल्हा परिषद शाळेत एकाच खोलीत सातवीपर्यंतचे विद्यार्थी

Jul 27, 2024 - 10:27
Jul 27, 2024 - 14:35
 0
चिपळूण : गोवळकोट जिल्हा परिषद शाळेत एकाच खोलीत सातवीपर्यंतचे विद्यार्थी

चिपळूण : गेल्या आठ वर्षापासून गोवळकोट जिल्हा परिषद मराठी शाळेत दरडग्रस्त ८ कुटुंबियांचे पुवर्नसन केले आहे. मात्र, या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची वर्गखोलीअभावी गैरसोय होत आहे. पूर्वी या शाळेत १७ विद्यार्थी संख्या होती. आता ३२ वर विद्यार्थी संख्या गेल्याने एकाच वर्ग खोलीत या विद्यार्थ्यांची व शिक्षकांचीही कोडी होऊ लागली आहे. तेव्हा संबंधित दरडग्रस्त कुटुंबियांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी गोवळकोट ग्रामस्थांमार्फत केली जात आहे.

शहरातील गोवळकोट कदम बौद्धवाडी येथे जुलै २०१५ मध्ये दरड कोसळून १५ कुटुंबियांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात तत्कालीन तहसीलदारांनी सबंधीत कुटुबियांना घराबाहेर काढून तेथील सर्व घरे सिल केली होती. आजतागायत ही घरे उघडण्यात आलेली नाहीत. उलट गळतीमुळे या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचवेळी संबंधित कुटुबियांचे
तात्पुरत्या स्वरूपात पर्याय व्यवस्था म्हणून गोवळकोट येथील जिल्हा परिषद शाळेत केली आहे. या शाळेत ८ कुटुबियांचे तर पेठमाप येथील ७ कुटुंबियांचे पुनर्वसन केले आहे. त्यानंतर या कुटुबियांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न झाले. मात्र अद्याप पुनर्वसनाच्या बाबतीत यश आलेले नाही. कापसाळ येथील पाटबंधारे विभागाची जागा पुनर्वसनासाठी निश्चीत केली होती. परंतु
त्यालाही अद्याप राज्य शासनाची मान्यता मिळालेली नाही.

प्रत्यक्षात या कुटुंबांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी शाळा देण्यात आली होती. मात्र आता आठ वर्षे होऊनही शाळा जिल्हा परिषदेच्या ताब्यात दिलेली नाही. या शाळेतील विद्यार्थी ५ वर्षे श्रीदेव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या सभागृहात शिक्षण घेत होते. महसूल विभागाकडे पत्रव्यवहार करून सभागृह ताब्यात घेऊन देवस्थानने सभागृहाला कुलुप ठोकले होते. त्यानंतर शाळेच्या एकाच खोलीत पहिली ते सातवीचे वर्ग भरवले जात आहेत. मात्र आता या शाळेत विद्यार्थी संख्या वाढली आहे. त्यामुळे एकाच वर्ग खोलीत विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत तहसीलदारांना व गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र अद्याप संबंधित कुटुंबियांच्या पर्यायी व्यवस्थेबाबत मार्ग काढलेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow