चिपळूण- वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे गरजेचे : प्रांताधिकारी आकाश लिंगाडे

Jul 27, 2024 - 14:32
Jul 27, 2024 - 14:38
 0
चिपळूण- वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे गरजेचे : प्रांताधिकारी आकाश लिंगाडे

चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्यानंतर नदीची वहनक्षमता वाढते. त्यामुळे चिपळूण शहरात येणारा संभाव्य पूर टाळता येतो. हे स्पष्ट झाल्यामुळे पावसाळ्यानंतर पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केली असल्याची माहिती चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी दिली.

चिपळूण शहरात २००५ मध्ये महापूर आला त्यानंतर शिवनदीतील गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली. सुरुवातीला हे काम निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आले नंतर पालिकेने शिवनदीतील गाळ काढला. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. जुलै २०२१ मध्ये शहरात महापूर आल्यानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याची मागणी जोर धरू लागली. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नदीतील गाळ काढण्यासाठी दहा कोटी रुपये दिले. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन मंडळातून चार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. जलसंपदा विभागाने वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी तीन टप्पे तयार केले आहेत. त्यामध्ये बहादूरशेख ते पेठमाप हा पहिला टप्पा तयार करण्यात आला.

चिपळूणचा पूर नियंत्रणात आणण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्या करत असताना वाशिष्ठी नदीच्या पहिल्या टप्प्यातील गाळ काढणे आवश्यक आहे. नदीतील गाळ काढल्यानंतर वहनक्षमता वाढते. त्यामुळे पाणी शहरात येत नाही. थेट अरबी समुद्राकडे निघून जाते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. - आकाश लिंगाडे, प्रांताधिकारी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow