दापोली : किरांबा गावात जमिनीला भेगा

Jul 31, 2024 - 10:18
Jul 31, 2024 - 10:19
 0
दापोली : किरांबा गावात जमिनीला भेगा

दापोली : मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून भूस्खलन, दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहे. दापोली तालुक्यातील किरांबा गावात आणि गावातील डोंगराला भेगा पडल्याने गावकरी भवभीत झाले आहेत. या डोंगरापासून लोकवस्तीला धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. 

डोंगराच्या भेगा वाढत असल्याने रस्त्यालाही भेगा पडून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना एक किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली आहे. काही लोकांना स्थलांतरित होण्याचे आदेशही देण्यात आले असल्यामुळे येथील ग्रामस्थांना थाटलेला संसार घेऊन नातेवाईकांसह सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागणार आहे.

या आधी तालुक्यातील भडवळे गावात जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या, त्या नंतर आता किरांबा गावात हा जमिनीला भेगा पडण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow