रत्नागिरी : गंजलेले खांब , जीर्ण वीजताराची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती

Jun 6, 2024 - 13:39
 0
रत्नागिरी : गंजलेले  खांब , जीर्ण वीजताराची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती

रत्नागिरी : पावसाळ्यात वीजपुरवठ्यात कमी बिघाड होईल, ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा व्हावा यासाठी पावसापूर्वीची दुरुस्ती करण्यात आली. लघु व उच्चदाब वीजवाहिन्यांच्या ५ हजार ४५० गाळ्यांतील वीजतारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या. २३० खराब व गंजलेले खांब, जीर्ण वीजतारा बदलल्या. ९५० मीटरच्या नादुरुस्त सर्व्हिस वायर, तर ४५ खराब रोहित्र पेट्या बदलल्याची माहिती महावितरणने दिली. जिल्ह्यातील ३२३ लघु व उच्चदाब वीजवाहिन्या गाळ्यातील सैल वीजतारा ओढल्या. २६ ठिकाणी लघु व उच्चदाब वीजवाहिन्या गाळ्यांना गार्डिंग बसविले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 06/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow