Paris Olympic 2024: मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेचा ऑलिम्पिकमध्ये पराक्रम; नेमबाजीत भारताला मिळवून दिले कांस्यपदक

Aug 1, 2024 - 13:47
 0
Paris Olympic 2024: मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेचा ऑलिम्पिकमध्ये पराक्रम; नेमबाजीत भारताला मिळवून दिले कांस्यपदक

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीत भारताने इतिहास रचला आहे. आज गुरुवारी झालेल्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये (50 m Rifle 3P Men's shooting) भारताचा नेमबाज स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने ब्रान्झ (कांस्य) पदक जिंकले. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीतील तिसरे पदक आहे. याआधी नेमबाजीत मनू भाकरने दोन तर सरबज्योत सिंगने एक कांस्यपदक जिंकले आहे.

महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी १९५२मध्ये हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले होतं. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. यानंतर आज त्यानंतर आज महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदकावर मोहोर उमटवत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकावला आहे.

एलिमिनिनेशन 7 व्या ते 3 -रा स्थानापर्यंत संघर्षमय झेप..

नेलिंग पोझिशनमध्ये सहावे स्थान

स्वप्निल कुसाळेने नेलिंग पोझिशन (गुडघे टेकून शुटींग करणे)च्या पहिल्या फेरीत 50.8 गुण मिळवले. या फेरीत तो सातव्या स्थानी राहिला. त्यानंतर दुस-या फेरीत कुसळेची गुण संख्या 101.7 झाली. यासह तो सहाव्या स्थानी पोहचला. याच प्रकारातील तिस-या फेरीत त्याने 10.5, 10.4, 10.3, 10.2 आणि 10.2 गुण नोंदवत सहावे स्थान काय ठेवले.

प्रोन पोझिशन पाचवे स्थान

प्रोन पोझिशनच्या (झोपून शुटींग करणे) पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रिव्रतस्कीने अचूक स्कोअरसह सुरुवात केली. कुसळेने तीन वेळा 10.5 आणि दोन वेळा 10.6 गुण मिळवले. यासह तो 5 व्या स्थानापर्यंत पोहोचला. दुस-या फेरीतील एक शॉटमध्ये कुसाळेने 10.8 पर्यंत मजल मारली. पण तरीही तो या फेरी अखेर पाचव्या स्थानावर राहिला. त्यानंतर तिस-या फेरीत एकदा 10.5, दोनदा 10.4 गुण आणि एकदा 10.2 गुण मिळवले. याफेरी अखेरही स्वप्निल पाचव्या स्थानी राहिला.

स्टॅडींग पोझिशन

स्वप्निलची स्टॅडींग पोझिशनच्या पहिल्या फेरीत खराब सुरुवात झाली. पहिलाच शॉटमध्ये त्याने केवळ 9.9 गुण मिळवले.

असा होतो सामना?

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकार स्पर्धेत आज अंतिम सामना खेळला. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन यामध्ये तीन प्रकारे नेमबाजी करावी लागते. पहिल्या प्रकारात गुडघे टिकण्याच्या स्थितीतून गुणांची कमाई करावी लागते. त्यानंतर प्रोन पद्धतीत अचूक लक्ष्यभेद करावा लागतो. आणि अखेर उभे राहून गुणांची कमाई करावी लागते.

स्वप्नीलची पात्रता फेरीतील कामगिरी

कुसाळेने पात्रता फेरीत नीलिंग पोझिशनमध्ये १९८ (९९, ९९) अशी कामगिरी केली होती. त्यानंतर प्रोनमध्ये १९७ (९८, ९९) व स्टँडिग पोझिशनमध्ये १९५ (९८, ९७) असे वेध घेतले होते. पात्रता फेरीतील ४४ स्पर्धकांमध्ये त्याने सातवे स्थान प्राप्त केले आणि याच बळावर तो फायनलमध्ये पोहोचला. या इव्हेंटमधील फायनल आज गुरुवारी झाली.

पात्रता फेरीत चीनच्या लिऊ युकूनने ५९४ गुणांसह पहिले स्थान संपादन केले तर नॉर्वेच्या जॉन हर्मन हेगने ५९३ अंकांसह दुसरे स्थान मिळवले होते. युक्रेनचा सर्हिय कुलिश ५९२ गुणांसह तिसर्‍या स्थानी होता. फ्रान्सचा ल्युकास क्रिझिस व सर्बियाचा लॅझर प्रत्येकी ५९२ गुणांवर राहिला होता. पोलंडचा टॉमस्ज बॅर्टनिक ५९० गुणांसह सहाव्या स्थानी राहिला होता. कुसाळेने ५९० गुणांसह सातवे तर झेक प्रजासत्ताकचा जिरी प्रिवरटस्कीने ५९० गुणांसह आठवे स्थान मिळवले.

स्वप्निलने यापूर्वी अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकवेळी पात्रता फेरीतील त्याची संधी अगदी काठावर हुकली होती.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 01-08-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow