Paris Olympics 2024: भारताला 4 सुवर्णपदक जिंकण्याची संधी; महाराष्ट्राचा पठ्ठ्याही मैदानात, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक

Aug 7, 2024 - 10:15
 0
Paris Olympics 2024: भारताला 4 सुवर्णपदक जिंकण्याची संधी; महाराष्ट्राचा पठ्ठ्याही मैदानात, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली.

तसेच गोल्डन बॉय नीरज चोप्राने देखील सुवर्ण पदकाच्या आशा उंचवल्या आहेत. नीरज चोप्राने 89.34 मीटरची सर्वोत्त भाला फेक करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. त्यामुळे नीरजला पुन्हा सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.

ऑलिम्पिकमधील आजचे संपूर्ण वेळापत्रक- Olympics Full Schedule Today 07 August

ऍथलेटिक्स: मिश्र मॅरेथॉन वॉक रिले (पदकासाठी): प्रियांका गोस्वामी आणि सूरज पनवार- सकाळी 11.00 वाजता

उंच उडी (पात्रता फेरी): सर्वेश कुशारे- दुपारी 1.35 वाजता

महिला भालाफेक (पात्रता फेरी): अन्नू राणी- दुपारी 1.55 वाजता

महिला 100 मीटर अडथळा (टप्पा 1): ज्योती याराजी (हीट फोर) - दुपारी 2.09 वाजता

तिहेरी उडी- पुरुष (पात्रता फेरी): प्रवीण चित्रवेल आणि अब्दुल्ला अबुबकर नारंगोलिंतेविडा - रात्री 10.45 वाजता

पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस (अंतिम फेरी): अविनाश साबळे - मध्यरात्री 1.13 (बुधवार-गुरुवार मध्यरात्री)

गोल्फ: महिला वैयक्तिक: अदिती अशोक आणि दीक्षा डागर - दुपारी 12.30 वाजता

टेबल टेनिस महिला संघ (उपांत्यपूर्व फेरी): भारत (श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना गिरीश कामथ) विरुद्ध जर्मनी - दुपारी 1.30

कुस्ती: महिला फ्रीस्टाइल 53 किलो (उपांत्यपूर्व फेरी): अंतिम पंघल विरुद्ध येनेप येटगील - दुपारी 3.05 वाजता

कुस्ती: महिला फ्रीस्टाइल 50 किलो (अंतिम फेरी) : विनेश फोगट - रात्री 10 वाजता

वेटलिफ्टिंग: महिला 49 किलो (पदकासाठी): मीराबाई चानू - रात्री 11.00 वाजता

आज भारताला 4 सुवर्णपदक जिंकण्याची संधी-

आता आज म्हणजेच 12व्या दिवशी भारताच्या खात्यात एकूण 4 सुवर्णपदके येणे अपेक्षित आहे. सुवर्णपदकासाठी सर्वांच्या नजरा विनेश फोगटवर असतील. कुस्तीशिवाय 3000 मीटर स्टीपलचेस, मॅरेथॉन शर्यतीच्या जागतिक मिश्र रिले फायनल आणि वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू वेटलिफ्टिंगमध्ये आज अॅक्शन मोडमध्ये दिसेल.

माराबाई चानूला ऐतिहासिक कामगिरीची संधी-

मीराबाई चानू पसंतीच्या 49 किलो वजन गटात आव्हान देणार असून, सर्वोत्कृष्ट कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास ती रौप्य किंवा कांस्य जिंकू शकेल. याच वजन गटात चीनची सध्याची चॅम्पियन होउ ब्रिहुई पुन्हा सुवर्णाची दावेदार आहे

भारतीय हॉकी संघ कांस्य पदक जिंकणार?

भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. भारतीय संघाला जर्मनीनं 3-2 गोलनं पराभूत केलं. जर्मनीनं दुसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाविरुद्ध आक्रमक खेळ केला. यामुळं भारताला 3-2 अशा गोलनं पराभव स्वीकारावा लागला. भारतानं सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेतली होती. मात्र, जर्मनीनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये पलटवार करत 2 गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारत 2-1 नं पिछाडीवर होता. भारताचा डिफेंडर अमित रोहिदास वर रेड कार्ड असल्यानं एका मॅचसाठी बंदी घातली गेली होती. याचा देखील भारताला फटका बसला. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अजूनही पदक मिळू शकतं. भारताला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.

 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow