पूजा खेडकरची UPSC विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने निकाली काढली

Aug 7, 2024 - 15:33
 0
पूजा खेडकरची UPSC विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने निकाली काढली

नवी दिल्ली : आपल्या मागण्यांमुळे चर्चेत आलेली आणि आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे आपलं आयएएस पद गेलेली पूजा खेडकरची (Puja Khedkar) याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.

मेरिटवर कमेंट न करता योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागण्याचे याचिकर्त्यांना उच्च न्यायालयाने स्वातंत्र्य दिले आहे. पूजा खेडकरच्या (Puja Khedkar) वकिलांनी यूपीएससीने तिचे आयएएस पद रद्द केल्याचं कळवलं नाही, त्यांनी थेट प्रेस नोट काढून सांगितलं असं पूजा खेडकरच्या वकीलांनी कोर्टात सांगितलं आहे.

यूपीएससीने पूजा खेडकरचे (Puja Khedkar)आयएएस पद रद्द केल्याचे पत्र पाठवणं गरजेचं होतं, असा युक्तिवाद पूजा खेडकरच्या वकिलांनी कोर्टासमोर केला आहे. त्यावरती यूपीएससीने सांगितलं की ती कुठे आहे हे माहीत नसल्यामुळे आम्ही याबाबतचं पत्रक काढलं. आम्ही पुढच्या २ दिवसात तिला मेल आणि तिच्या शेवटच्या पत्यावर ही माहिती पाठवू असंही यावेळी यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. यूपीएससीने दिलेल्या माहितीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली आहे.

न्यायालयाने पूजा खेडकरचा (Puja Khedkar)अटकपूर्व जामीन नाकारला. यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकरचे आयएएस पद काढून घेतलं असून तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवर अब्रुनुकसानीचा दावा करणार

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवर (Pooja Khedkar) अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. पूजा खेडकरनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) पोलिसांना दिली आहे आणि यूपीएससीकडे देखील तशी तक्रार केली होती. पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधीत सुहास दिवसेंनी लैंगिक छळ केल्याचा पुजा खेडकरचा आरोप आहे. दरम्यान या आरोपांबाबत चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांनी तीन वेळा समन्स बजवून देखील पूजा खेडकर हजर झालेली नाही.

पूजा खेडकरनी (Pooja Khedkar)पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. पूजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्या विरोधात वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली. दिवसे यांनी लैगिंक आणि मानसिक छळ केल्याचे पूजा खेडकरनी आरोप केले होते. ⁠वाशिम पोलिसांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा खेडकरची तक्रार नोंदवून घेतली. मात्र दिवसे यांच्याविरोधातील तक्रार वाशिम पोलीसांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला या तक्रारीसंदर्भात काही चौकशीसाठी तब्बल तीन वेळा समन्स पाठवून देखील ती गैरहजर राहिली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:01 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow