फणसोप येथे घरफोडीचा प्रयत्न

Aug 8, 2024 - 10:07
 0
फणसोप येथे घरफोडीचा प्रयत्न

रत्नागिरी : तालुक्यातील फणसोप सडा येथील घराच्या मागील व पुढील दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञाताने चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ४ ऑगस्ट रोजी घडली आहे. सुश्रुत शैलेश भाटकर (३६) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

त्यानुसार, ते ४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान बाहेर गावी गेले असताना अज्ञाताने फणसोपसडा येथील त्यांच्या घराच्या मागील व पुढील दरवाजाचा कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow