ठाकरेंच्या शिवसेनेचा 'भगवा सप्ताह' अणसुरे गणात उत्साहात संपन्न

Aug 8, 2024 - 09:55
 0
ठाकरेंच्या शिवसेनेचा 'भगवा सप्ताह' अणसुरे गणात उत्साहात संपन्न

■ पुन्हा एकदा नव्या जोमानं मशाल घराघरात पोहचविण्यासाठी ठाकरे शिवसैनिक सज्ज..

राजापूर : शिवसेना पक्षप्रमुख,माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात "भगवा सप्ताह ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट पर्यत सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजापूर तालुक्यात लांजा-राजापूर-साखरपा चे एकनिष्ठ आमदार श्री. राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली दि.७ ऑगस्ट २४ रोजी  णसुरे गणात भगवा सप्ताह कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला. 

शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख श्री. चंद्रप्रकाश नकाशे यांनी संपुर्ण भगवा सप्ताहाचे महत्त्व समजावून सांगितले. घराघरात धगधगती मशाल पोहचण्यासाठी शिवसैनिकांनी तयार राहा, असा पक्षप्रमुखांचा आदेश आहे. त्याचे पालन करा, असा संदेश सर्व शिवसैनिकान दिला. त्याचप्रमाणे तालुका समन्वयक श्री. प्रकाश कुवळेकर यांनी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट समजावून सांगितले. शिवसेना उपनेते तथा आमदार राजन साळवी यांनी संपूर्ण कोकणातील पूर्व इतिहास मांडला आणि शिवसेना आणि कोकण यामधील नात्याचा पाढाच वाचला.
            

या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख श्री कमलाकर कदम, महिला आघाडी तालुका संघटक सौ. प्राची शिर्के मॅडम, उपतालुकाप्रमुख श्री तात्या सरवणकर, युवासेना तालुका युवाअधिकारी श्री सुरेश एरणकर, शिवसेना विभाग संपर्क प्रमुख श्री विद्याधर पेडणेकर, अणसुरे उपविभाग संपर्कप्रमुख श्री नामदेव मयेकर, विभाग प्रमुख श्री नंदकिशोर मिरगुले, ज्येष्ठविधीतज्ञ श्री शशिकांत सुतार, शिव सहकार सेना उपजिल्हा संघटक श्री समीर शिरवडकर, युवा तालुका समन्वयक प्रसाद मांजरेकर, अणसुरे गणातील सर्व शाखाप्रमुख, सरपंच, सदस्य, उपशाखाप्रमूख, महिला आघाडी, गटप्रमुख, युवासेना, अन्य अंगीकृत संघटना आदि उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow