जुन्या पेन्शनबाबत राज्य सरकार सकारात्मक : ना. उदय सामंत

Aug 13, 2024 - 12:37
 0
जुन्या पेन्शनबाबत राज्य सरकार सकारात्मक : ना. उदय सामंत

रत्नागिरी : शिक्षकांचे बहुतांश प्रश्न महायुती सरकारने सोडविले आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक आहे. तसेच जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीला झालेला २५ कोटी रुपये दंड माफ करण्याचा निर्णय येत्या आठ दिवसात घेतला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीच्या मोबाईल अॅपचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. सामंत यांनी सांगितले, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सोडविले जातील. नासा येथे गेलेल्या रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचे तेथील शास्त्रज्ञांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुशल बुद्धीमत्ता असल्याचे सांगितले. हे शिक्षकांच्या मेहनतीचे यश आहे. पालकमंत्री सामंत यांनी पतसंस्थेच्या कामाचा गौरव केला. माझ्या मतदारसंघातील माध्यमिक शिक्षकांची ही पतसंस्था राज्याला आदर्शवत काम करत आहे. असे मी राज्यात सांगत असतो. शिक्षकांच्या पतसंस्थेचे काम उत्तम चालत असल्याने चांगलं काम सुरू आहे. तेथे राजकारण आणत नाही. चांगल्याला पाठिंबा देतो. परंतु काही शिक्षक राजकारण करतात. त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असेही सामंत यांनी सांगितले. 

या वेळी जिल्हा निबंधक डॉ. सोपान शिंदे, संस्थाध्यक्ष सागर पाटील, सर्व संचालक, सेक्रेटरी, सभासद उपस्थित होते. 

पगारदार पतसंस्थांना अंशदानाचा भुर्दंड बसत आहे. त्यातून सूट मिळावी, पतपेढीला आयकर विभागाने आकारलेला २५ कोटींचा दंड माफ करण्यात यावा, विद्यार्थी क्षमतेची अट शिथील करावी, अशा मागण्या यावेळी संचालक मंडळाकडून करण्यात  आल्या. 

विज्ञान भवन उभारण्याची मागणी
 
अध्यक्ष सागर पाटील म्हणाले, रत्नागिरी जिल्हा दहावी, बारावीच्या परीक्षेत कायम उच्च स्थानावर राहिला आहे. गेली तेरा वर्ष अखंडीत परंपरा जपली आहे. आपल्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता खूप आहे. त्याला चालना देण्याची आवश्यकता आहे. यासाठी रत्नागिरीत विज्ञान भवन उभारावे. जुनी पेन्शन योजना, पगारदार पतसंस्थांना अंशदानाचा भूर्दंड बसत आहे. त्यातून सूट मिळावी, विद्यार्थी क्षमतेची अट शिथिल करावी. अशा मागण्या केल्या. विज्ञान भवन वर्षभरात उभारू, अशी ग्वाही पालकमंत्री सामंत यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:06 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow