चिपळूण : खडपोलीत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविल्या सैनिकांसाठी राख्या

Jul 25, 2024 - 16:30
 0
चिपळूण : खडपोलीत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविल्या सैनिकांसाठी राख्या

चिपळूण : तालुक्यातील खडपोली न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशातील सैनिकांसाठी राख्या बनविण्यात आल्या आहेत. या राख्या विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपकडे सुपूर्द करण्यात आल्या.

'एक राखी देशासाठी, एक राखी सैनिकांसाठी' हा उपक्रम राबविण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल खडपोली व समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुप यांच्या प्रेरणेने सीमेवरील जवानांना राख्या पाठविण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम दि. २० जुलै रोजी झाला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

मुख्याधापिका चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच माजी सैनिक संभाजी चव्हाण, विद्यमान सैनिक इकबाल चिपळूणकर, प्रसाद वनगे, सुधीर मोरे, अनिल पिनगे, रविराज दरेकर, साहिल तांबे, शिक्षक चित्रकार, जाधव, खेतले, जांभळे, शिंदे, शिक्षकेतर कर्मचारी कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:57 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow