पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा पद्धतीत पास होऊ शकता; NEET मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

Jul 22, 2024 - 15:22
 0
पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा पद्धतीत पास होऊ शकता; NEET मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नीट परिक्षेवरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापल्याचे पाहायला मिळाले.

NEET परिक्षेवरुन काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि द्रमुक सारख्या विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आणि NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी लोकसभेत काँग्रेसच्या वतीने प्रभारी नेतृत्व करत असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विरोध केला यामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, 'देशात लाखो विद्यार्थी जे घडत आहे त्याबद्दल चिंतित आहेत त्यांचा भारतीय परीक्षा प्रणाली फसवी असल्याचा विश्वास आहे. जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा पद्धतीत पास होऊ शकता, तुम्ही पैशाने कागद खरेदी करू शकता हे लोकांना माहीत आहे आणि विरोधकांचीही तीच भावना आहे.

राहुल गांधी म्हणाले की, 'संपूर्ण देशाला हे स्पष्ट झाले आहे की आपल्या परीक्षा पद्धतीत खूप गंभीर समस्या आहेत. फक्त NEET मध्येच नाही तर सर्व प्रमुख परीक्षांमध्ये असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मंत्री यांना द्यावी लागतील. सिस्टीमिक स्तरावर याचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय करत आहात? मंत्री महोदयांनी स्वतः सोडून सगळ्यांनाच दोष दिला आहे. मला वाटत नाही की त्यांना इथे काय चालले आहे याची मूलभूत माहिती देखील समजत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले. सभागृहाला बोलताना म्हणाले, 'मला कोणाकडूनही माझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र नको आहे. माझ्या जनतेने मला निवडून पाठवले आहे. माझ्या पंतप्रधानांनी मला जबाबदारी दिली आहे. देशाची परीक्षा प्रणाली रद्दबातल आहे असे म्हणणे. यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची काँग्रेसवर टीका

मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला.'कपिल सिब्बल यांनी २०१० साली त्यांच्या सरकारमध्ये शिक्षण सुधारणा विधेयक आणले होते. त्यावर आज राहुल गांधी प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या ७ वर्षांत पेपरफुटीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. हे नीट परिक्षा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो की NTA नंतर २४० हून अधिक परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या आहेत, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow