रत्नागिरी : गयाळवाडी येथे एसटीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Jul 10, 2024 - 11:05
Jul 10, 2024 - 11:06
 0
रत्नागिरी : गयाळवाडी येथे एसटीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या एसटीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार ४ जुलै रोजी सायंकाळी ४.१५ वा. गयाळवाडी फाट्याच्या अलीकडे घडली होती. सचिन मधुकर वाडकर (३९, रा. गयाळवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हे. कॉ. महेंद्र खापरे यांनी तक्रार दिली आहे. 

त्यानुसार गुरुवारी सायंकाळी संशयित सचिन वाडकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८-एआर-१३०८) ही रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्याने घेऊन जात होता. त्याच सुमारास (एमएच-१४-बीटी-२५३५) ही एसटी समोरून येत होती. ही दोन्ही वाहने खेडशी गयाळवाडी फाट्याच्या अलीकडे आली असता सचिन वाडकरचा त्याच्या दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकीने विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या या एस.टी.ला धडक दिल्याने हा अपघात झाला. यात सचिन वाडकरला दुखापत झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow