खेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन

Aug 26, 2024 - 11:16
 0
खेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन

खेड : शहरातील शिवतर रोड येथील सम्राट अशोक नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची नव्याने उभारणी करण्यासाठी ३ कोटी ४१ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.

सभागृहाची सम्राट अशोक नगर येथे उभारणी करण्यासाठी रिपाइंचे कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे निवेदन दिले होते. खेड दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व शिवसेना रामदास कदम यांच्या उपस्थितीत सभागृह बांधकामाचे भूमिपूजन झाले. या वेळी आमदार योगेश कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow