करबुडे येथे विवाहितेची विहिरीत उडी घेत आत्महत्या
रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथील विवाहितेने अज्ञात कारणातून घराशेजारील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. दर्शना दिनेश शितप (३८, रा. करबुडे, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
बुधवारी सकाळी ७ वा. सुमारास तिच्या घरातील नातेवाईकांना दर्शना घरात कुठेही दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी तिचा आजुबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा घराशेजारील विहिरीत दर्शना बुडालेल्या अवस्थेत दिसून आली. या बाबत ग्रामीण पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्किम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 29-08-2024
What's Your Reaction?