रत्नागिरी : नर्सिंग विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी आणखी दोघे चौकशीसाठी ताब्यात

Aug 29, 2024 - 10:15
 0
रत्नागिरी : नर्सिंग विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी आणखी दोघे चौकशीसाठी ताब्यात

रत्नागिरी : शहरानजीकच्या चंपक मैदान येथे १९ वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पोलिस विभागाकडून सखोल तपास करण्यात येत आहे. या तपासासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाकडून बुधवारी अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात ५ जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.

याप्रकरणी पीडित युवतीने दिलेला जबाब आणि वस्तुस्थितीमध्ये काही प्रमाणात विसंगती आढळून येत असल्याने पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या पथकाद्वारे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल्सद्वारे तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येत आहे. पीडित युवतीच्या वैद्यकीय चाचणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणातील तपासाला आणखी वेग मिळण्यास मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow