लांजा शहर समन्वय समिती आज नगर पंचायतीवर धडकणार

Aug 29, 2024 - 10:27
Aug 29, 2024 - 10:44
 0
लांजा शहर समन्वय समिती आज नगर पंचायतीवर धडकणार

लांजा : लांजा शहरातील विविध विकासकामे यासंदर्भात निवेदन देऊनही लांबा नगरपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याचा जाब विचाण्यासाठी व लांजा शहराच्या विकासासाठी गुरुवारी लांजा शहर समन्वय समितीने नगर पंचायतीवर धडक देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी पत्रकारांना दिली.

लांजा शहराच्या विकासासाठी व विविध समस्या संदर्भात लांजातील विविध क्षेत्रातील व्यक्तीनी एकत्र येऊन समन्वय समिती स्थापन केली आहे. या समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी १८ जून रोजी नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांची भेट घेऊन शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने नगर पंचायत हद्दीतील अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली असून अनेक ठिकाणी गटारांची साफसफाई झालेली नाही. तुंबलेल्या गटांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत नाहे. त्याचाप्रमाणे शहरात मोकाट पुरे आणि कुल्यांचा उपद्रव देखील वायला आहे. त्यामुळेच्या देखील वाढ आहे. याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी लांजा समन्वय समितीने केली होती. 

शहरातील ज्या ठिकाणी निवासी संकुले आहेत. अशा निवासी संकुलाचा सांडपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक संकुलांनी आपले सांडपाणी हे नजीकच्या वहाळात सोडले आहे.

त्यामुळे प्रदू‌षणाचा धोका अधिक असून भविष्यात निवासी संकुल रहिवासी किंवा बिल्डर यांना परवानगी देताना येथील सांडपाण्याचा प्रश्न सोडवाला आहे का? हे पाहूनानी द्यावी अशी मागणी केली. तसेच शहरात अनधिकृत घरांची संख्या देखील आहे. अनधिकृत घरे म्हणून घरपट्टी आकारली जाते. त्या तुलनेत त्यांना वीज मीटर किवा नळ जोडणी अन्य सेवासुविधा मिळत नाहीत, असे निदर्शनास आणून देण्यात आले होते.

यावेळी मुख्याधिकारी हर्षला राणे, प्रशासकीय अधिकारी अविराज पाटील यांनी याबाबत तोडगा काढून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते मात्र कार्यवाही झाल्याने नाराज झालेली लांजा शहर समन्वय समिती नगर पंचायतीवर धडक देणार असल्याचे प्रसन्न शेटये यांनी सांगितले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow