लांजा : कोत्रेवाडी येथील डंम्पिग ग्राउंडविरोधातील लढ्याला पाठिंबा : उल्का विश्वासराव

Sep 2, 2024 - 09:45
 0
लांजा : कोत्रेवाडी येथील डंम्पिग ग्राउंडविरोधातील लढ्याला पाठिंबा : उल्का विश्वासराव

लांजा : न्यायप्रविष्ट बाब असतानाही डंम्पिंग ग्राउंडसाठी जागेचे खरेदीखत नगरपंचायतीकडून कसे केले जाते? असा प्रश्न उपस्थित करतानाच या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उभारलेल्या लढ्याला पूर्ण पाठिंबा आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आपण कोत्रेवाडी ग्रामस्थांसोबत राहणार असल्याची ग्वाही भाजपच्या लांजा राजापूर विधानसभा निवडणूकप्रमुख उल्का विश्वासराव यांनी दिली.

विश्वासराव यांची ग्रामस्थांनी भेट घेतली. ग्रामस्थांनी त्यांना डंम्पिंग ग्राउंडविरोधात उभारलेल्या लढ्याची माहिती दिली. जिल्हास्तरीय समितीने नाकारलेल्या आणि ज्या जागेकडे अधिकृत जाण्यासाठी रस्ता नाही, लगतच नागरिक वस्ती आणि पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत असतील तर अशी जागा डम्पिंग प्रकल्पासाठी घेणे हे योग्य नाही.

तरीही या जागेसाठी लांजा नगरपंचायतीचा अट्टाहास आहे. डम्पिंग ग्राउंड विरोधात ग्रामस्थांनी चार वर्षापासून लढा उभारलेला असून आणि मुंबई हायकोटात दावा दाखल केला आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असूनही नगरपंचायतीकडून डम्पिंग ग्राउंडसाठी जागची खरेदी केशी केली जाते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यामुळे ग्रामस्थांचा डम्पिंगला ग्राउंडला असलेला विरोध योग्यच असून आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे विश्वासराव यांनी सांगितले. ग्रामस्थांवर जबरदस्तीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो चुकीचा असून, या प्रकरणी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार, मुख्याधिकारी यांची भेट घेणार असल्याचे विश्वासराव यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow