डेरवण येथील क्रॉसकंट्री स्पर्धेत राज्यभरातील ६०० स्पर्धकांचा सहभाग

Sep 2, 2024 - 09:44
 0
डेरवण येथील क्रॉसकंट्री स्पर्धेत राज्यभरातील ६०० स्पर्धकांचा सहभाग

चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्ट संचलित क्रीडा संकुलात १० वी भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ६०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.स्पर्धेचे उदघाटन आंतरराष्ट्रीय धावपटू ईशा जाधव हिच्या हस्ते करण्यात आले.

ही स्पर्धा १२ , १४, १६ आणि १८ वयोगटातील मुले व मुली या आठ विभागामध्ये झाली. प्रत्येक सहभागी खेळाडूंना ट्रस्टतर्फे टी-शर्ट वितरीत करण्यात आले होते.

या स्पर्धेत महाड (रायगड), सांगली, सातारा, कोल्हापूर, पालघर येथूनही स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमुळे मुख्यत:स्थानिक, राज्यातील मुलांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे हा उद्देश आहे. याकरिता स्पर्धेचे व्यासपीठ संस्थेद्वारे देण्यात आले आहे. गेली 10 वर्षे ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जाते.

स्पर्धेचा निकाल वयोगटाप्रमाणे (अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक)-

१२ वर्षाखालील मुले (२ किमी.)- श्रावण साळुंखे, समर्थ सुर्वे, पार्थ पवार, रवी कश्यप, वेदांत खेराडे, मुली (२ किमी ) - अबोली वास्के, आराध्या वास्के, भूमी म्हात्रे, रुद्र शिवगण, अनुष्का राणीम.

१४ वर्षाखालील मुले (३ किमी)- अथर्व चव्हाण, प्रणीत खळे, अथर्व दवंडे, रोषण राठोड, विराज पाटील. मुली (२ किमी)- हुमेरा सय्यद, पूजा सावंत, सुरष्टी नागरपोळे, हर्षदा जोशी, मुक्त भुवड.

१६ वर्षाखालील मुले (४ किमी.)- अथर्व ताटे, सोहम साळुंखे, स्वागत पाटील, कार्तिक भूसेर, सैप्रसाद वराडकर. मुली (३ कि.मी.) अनुजा पवार, आरोही पालखडे, तन्मयी जाधव, पल्लवी हुमणे, समिक्षा जस्वान.

१८ वर्षाखालील मुले (६ किमी)- स्वराज गुढेकर, सुयश खरात, ऋषिकेत रेवाळे, दरेश्वर शेजूळ, बिबेक मौनी. मुली (४ किमी)- मंजिरी गावडे, आदिबा तंबू, अनुश्री आंबेकर, निधी शिगवण, वनिता खरात.

स्पर्धेतील विविध गटातील प्रथम पाच क्रमांकाच्या खेळाडूंना रु. ५५ हजारांची रोख पारितोषिके , पदके आणि प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

यावेळी डॉ. मानसिंग घाडगे, डॉ. नेताजी पाटील, प्रा. चंद्रशेखर एल, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे संदीप तावडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, शैक्षणिक संचालिका शरयू यशवंतराव, श्रीकांत पराडकर प्रसाद परांजपे, अजित गालवणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow