आयफोन 15 प्लसवर तब्बल 19 हजारांची सूट
IPhone 15 Plus Discount: आपल्याकडेही ॲपल कंपनीचा फोन असावा असे प्रत्येकालाच वाटते. येत्या 9 सप्टेंबर रोजी ॲपल कंपनीकडून आयफोन 16 सिरीज लॉन्च केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिरीजची लोक वाट पाहात आहेत.
दरम्यान, एकीकडे आयफोन 16 सिरीज लॉन्च होत असताना दुसरीकडे आता आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus) हा मोबाईल फोन स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी चालून आली आहे. या मोबाईल फोनवर तुम्हाला साधारण 19 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
आयफोन 15 प्लस या मोबाईल फोनवरील सूट ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही हा फोन तब्बल 19 हजार रुपयांच्या डिस्काऊंटवर खरेदी करू शकता. विशेष म्हणजे ही सूट मिळवताना तुम्हाला कोणताही जुन्हा फोन एक्स्चेंज करण्याची गरज नाही.
फ्लिपकार्टवर नेमकी ऑफर काय आहे?
फ्लिपकार्टवर (Flipkart) आयफोन 15 प्लस या मोबाईल फोनची किंमत साधारण 89,600 रुपये आहे. मात्र या फोनवर साधारण 21 टक्क्यांची सूट दिली जात आहे. म्हणजेच तुम्हाला हा फोन फक्त 69,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या मोबाईल फोनवर तुम्हाला तब्बल 19,601 रुपयांची सूट मिळत आहे. ही सूट फक्त पिवळ्या रंगाच्या आयफोन 15 प्लस मोबाईलवर लागू आहे. अन्य रंगाच्या आयफोन 15 प्लस मोबाईलवर ही सूट लागू नाही. अन्य रंगाचे आयफोन 15 प्लस मोबाईल फोन तुम्हाला 72,999 रुपयांना खरेदी करता येतील.
आयफोन 15 पल्स मोबाईल फोनचे वैशिष्य काय आहे?
या मोबाईल फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 6.1 इंच असून त्याला OLED डिस्प्ले आहे. या मोबाईल फोनमध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले पॅनल आहे. या फोनमध्ये डायनॅमिक आयलँड आणि एचडीआर डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 2000 पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
या आयफोनचे वजन फक्त 201 ग्रॅम आहे. हा फोन तुम्हाला IP68 रेटिंगसह येतो. म्हणजेच हा फोन पाणी आणि धुळीने खराब होत नाही. या फोनमध्ये A16 बायोनिक चिप प्रोसेसर आहे. iPhone 15 Plus या आयफोनमध्ये 48MP प्रायमेरी कॅमेरा तसेच 12MP सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 02/Sep/2024
What's Your Reaction?